Join us

मानखुर्दमध्ये मंडाला येथे झोपडपट्टीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 21:32 IST

मानखुर्दमधल्या मंडाला इथल्या माया हॉटेलजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबई-  मानखुर्दमधील मंडाळा येथील माया हॉटेलजवळील झोपडपट्टीतील भंगाराच्या दुकानाला रविवारी सकाळी ५.५0 च्या दरम्यान भीषण आग लागली. ६ वाजता अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. लेव्हल ची आग असल्याची नोंद करण्यात आली आहे.  सकाळी ९.४५ वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. दरम्यान या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :मुंबईआग