Join us

मुंबई: काळाचौकीत गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 13:08 IST

सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

मुंबई: काळाचौकी परिसरातील एका गोदामाला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. येथील दत्ताराम लाड मार्गावर हे गोदाम आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग भीषण स्वरुपाची आहे. या घटनेची वर्दी मिळतात अग्निशमन दलाची आठ फायर इंजिन्स आणि पाच पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या गोदामाच्या बाजूला काही इमारती आहेत. त्यामुळे ही आग या भागात पसरणार नाही, याची काळजी अग्निशमन दलाकडून घेतली जात आहे. या आगीमुळे सध्या या परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठले आहेत. 

 

टॅग्स :आगमुंबई