Join us

मेल-एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखा, मध्य रेल्वेचे मुकुल जैन यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 01:38 IST

म. रेल्वेच्या परिचालन विभागाच्या वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापकांच्या परिषदेचे अध्यक्ष होते.

मुंबई : मेल-एक्स्प्रेस, उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखण्याचे व मालगाड्या चांगल्या भरण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य परिचालन व्यवस्थापक मुकुल जैन यांनी मध्य रेल्वेच्या नूतनीकृत आपत्कालीन नियंत्रण कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व परिचालन व्यवस्थापकांच्या परिषदेत बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हे नियंत्रण कार्यालय आहे.

जैन यांनी विभागीय कार्यकारी प्रमुखांशी नवीन लाइन, तिसरी आणि चौथी लाइन व विविध प्रकल्पांच्या बांधकामादरम्यान घेतले जाणारे निर्णय व अन्य उपक्रम याबद्दलही चर्चा केली. तसेच मालवाहतुकीवर भर देत त्यातून महसूल निर्मितीवर विशेष लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

म. रेल्वेच्या परिचालन विभागाच्या वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापकांच्या परिषदेचे अध्यक्ष होते. यामध्ये मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या पाचही विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. या परिषदेदरम्यान जैन यांनी मेल/एक्स्प्रेउपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखण्याचे आणि मालगाड्या चांगल्या भरण्याचे  आवाहन केले. 

 अपघात, रूळावरून गाडी घसरणे, कोणताही असामान्य अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत मध्य रेल्वेसाठी रेल्वे ऑपरेशन्सचे मुख्य आधार  केंद्र हे  नियंत्रण कार्यालय असते.  हे नियंत्रण कार्यालय सर्व ५ विभागांसाठी आहे. तांत्रिकदृष्ट्या कुशल कर्मचाऱ्यांसह सज्ज आहे.

टॅग्स :रेल्वे