Mahim Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या माहीम मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा निसटता विजय झाला आहे. दुसऱ्या नंबरवर सदा सरवणकर यांचा दीड हजार मतांनी पराभव झाला आहे. याच दरम्यान विजयानंतर ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"आज आमच्यासमोर दोन तगडे उमेदवार होते. एक धनवान होता... ज्यांची प्रॉपर्टी किती असेल हे त्यांनाच माहीत नसेल आणि दुसरीकडे एक राजपुत्र होता. त्यांच्यासमोर आम्हाला टफ द्यायची होती. तो दिवस आज आलेला आहे" असं महेश सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच "सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे. पुढचे पाच वर्षे मी एवढं काम करणार आहे की आमदार कसा असावा हे संपूर्ण जनतेला समजेल. खूप टफ झाली पण मी विजयी झालो" असंही सांगितलं.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024
"माय-बाप जनता, आमचे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते यांचा हा विजय आहे. सर्वसामान्य लोकांचा हा विजय आहे. उद्धव साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आज आमच्यासमोर दोन तगडे उमेदवार होते. एक धनवान होता... ज्याची प्रॉपर्टी किती असेल हे त्यांनाच माहीत नसेल आणि दुसरीकडे एक राजपुत्र होता. त्यांच्यासमोर आम्हाला टफ द्यायची होती. तो दिवस आज आलेला आहे."
"सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे. पुढचे पाच वर्षे मी एवढं काम करणार आहे की, आमदार कसा असावा हे संपूर्ण जनतेला समजेल. खूप टफ झाली पण मी विजयी झालो. त्यांच्याकडे पोलीस पॉवर होती, सर्व पॉवर होत्या... तरीपण मी एका जिद्दीने बाळासाहेबांचा सैनिक जसा लढतो तसा लढलो. आमच्या विभागावर बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. आम्ही आमचा भगवा डौलाने फडकवला आहे" असं महेश सावंत यांनी म्हटलं आहे.