‘माहीम फन फेअर’ होणार, पोलिसांची नोटीस रद्द; उच्च न्यायालयाची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 06:28 IST2024-12-25T06:28:32+5:302024-12-25T06:28:40+5:30
गर्दीचे कारण देत पोलिसांनी मेळाव्यास परवानगी नाकारली होती.

‘माहीम फन फेअर’ होणार, पोलिसांची नोटीस रद्द; उच्च न्यायालयाची चपराक
मुंबई : माहीम येथील ‘फन फेअर’ आयोजित न करण्यासंदर्भात पोलिसांनी बजावलेली नोटीस उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. ऐन नाताळच्या सुट्टीत फन फेअर आयोजित केल्यामुळे होणाऱ्या गर्दीचे कारण देत पोलिसांनी मेळाव्यास परवानगी नाकारली होती.
पोलिस मेळावा रोखण्याऐवजी गर्दी आणि वाहतूककोंडी होऊ नये यासाठी अतिरिक्त बळ वापरू शकतात, असे न्या. शिवकुमार डिगे आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन न्यायालयाने नमूद केले. तसेच मेळावा रद्द होणार नाही, असेही स्पष्ट केले. माहीममधील हा मेळावा हजरत मखदूम फकीह अली महिमी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येतो. १० दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम, स्ट्रीट फूड व अन्य कार्यक्रमांची रेलचेल असते.