ठाण्याचा महेश पाटील ठरला 'खासदार श्री'! बॉडी बिल्डींग स्पर्धेला उदंड प्रतिसाद
By मनोहर कुंभेजकर | Updated: February 26, 2024 00:52 IST2024-02-26T00:51:31+5:302024-02-26T00:52:02+5:30
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रंगला सोहळा

ठाण्याचा महेश पाटील ठरला 'खासदार श्री'! बॉडी बिल्डींग स्पर्धेला उदंड प्रतिसाद
मनोहर कुंभेजकर, मुंबई: स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे अटीतटीच्या झालेल्या राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाण्याच्या महेश पाटील याने 'खासदार श्री 2024' या किताबासह एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी पटकावली. तर कोल्हापूरच्या अजिंक्य रेडकर याने दुसरा आणि साताऱ्याच्या अभिषेक पाडाळे याने तिसरा क्रमांक पटकाविला. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेला राज्यभरातील शरीरसौषठवपटुंनी चांगला प्रतिसाद दिल्याने क्रीडा रसिकांनी यावेळी मोठी गर्दी केली.
राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या आयोजनात महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि छत्रपती शिवाजी महाराज ओपन जिम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुमारे १५०हून अधिक शरीरसौष्ठपटुंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. तसेच स्पर्धेदरम्यान महिला शरीरसौष्ठपटुंनी देखील विशेष सादरीकरण केले. सुमारे ३० पंचांच्या टीमने या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन केले.