Join us

महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 06:03 IST

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे.

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. २५ एप्रिलला पुरस्कार वितरण होईल. 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर झाला असून, त्याचे स्वरूप ६ लाख रु., मानपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीचे पदक असे आहे. 

हिंदीतील मानाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना मिळेल. या पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे १० लाख व ६ लाख  रोख, मानपत्र, चांदीचे पदक असे आहे.

टॅग्स :महेश मांजरेकर मुक्ता बर्वेअनुपम खेरमहाराष्ट्र सरकार