दिव्यांगांना मोफत उपकरणांसाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्म - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:24 IST2020-12-12T04:24:59+5:302020-12-12T04:24:59+5:30

दिव्यांगांना मोफत उपकरणांसाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्म - धनंजय मुंडे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज लोकार्पण : बार्टीच्या सर्व योजनांची माहिती ...

'Mahasharad' digital platform for free devices for the disabled - Dhananjay Munde | दिव्यांगांना मोफत उपकरणांसाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्म - धनंजय मुंडे

दिव्यांगांना मोफत उपकरणांसाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्म - धनंजय मुंडे

दिव्यांगांना मोफत उपकरणांसाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्म - धनंजय मुंडे

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज लोकार्पण : बार्टीच्या सर्व योजनांची माहिती देणारे ‘ई-बार्टी’ ॲप तयार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना लागणारी साहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ या डिजिटल प्लॅटफाॅर्मचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे ‘ई-बार्टी’ या मोबाइल ॲपचेही लोकार्पण करण्यात येणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या लाइव्ह सोहळ्यामध्ये या पोर्टलचे व ई-बार्टी ॲपचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. दिव्यांगांसाठी बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर असे दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची साहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही. तसेच, समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, उद्योजकांसह अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण देण्यासाठी इच्छुक असतात. या गरजू दिव्यांग व्यक्तींची आणि दात्यांची सांगड घालून देण्याचे काम ‘महाशरद’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केले जाणार आहे. महाशरद प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ १२ डिसेंबरपासून सुरू होत असून मार्च अखेरपर्यंत मोबाइल ॲप्लिकेशन स्वरूपातदेखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मुंडेंनी दिली.

तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी)चे मोबाइल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या ॲपमध्ये एम - गव्हर्नन्ससहित, बार्टीतील सर्व योजना, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अधिछात्रवृत्ती योजना आदी सर्व योजना एका क्लिकवर मोबाइलवरून हाताळता येणार आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Web Title: 'Mahasharad' digital platform for free devices for the disabled - Dhananjay Munde