Join us

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 07:05 IST

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत असून ते २ मार्चपर्यंत चालणारआहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस केवळ सहाच असतील.

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत असून ते २ मार्चपर्यंत चालणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस केवळ सहाच असतील. अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत सादर करणार आहेत.या अधिवेशनामध्ये राज्यातील दुष्काळावर चर्चा होणार आहे. विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयकेही याच अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. विधान परिषदेतही एक प्रलंबित विधेयक मांडले जाईल.

टॅग्स :महाराष्ट्रअर्थसंकल्प