Join us  

Vidhan Sabha 2019: नरेंद्र मोदींनी राम मंदिरावरून 'बाण' मारला, उद्धव ठाकरेंचा सूरच बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 3:34 PM

राम मंदिराबाबत मी जी भूमिका मांडली, ती देशातील तमाम हिंदूंची भावना आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर, सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहेच

मुंबई - अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही, शिवसेना अधून-मधून या विषयावरून केंद्र सरकारवर 'बाण' सोडतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अध्यादेश काढून राम मंदिर उभारावं, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काही नेतेमंडळी करत आहेत. त्यावरून, नाशिकमधील सभेत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे कानउघाडणी केल्यानंतर आज उद्धव यांचा सूर बदलल्याचं पाहायला मिळालं.    

राम मंदिराबाबत मी जी भूमिका मांडली, ती देशातील तमाम हिंदूंची भावना आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर, सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहेच. ते जो निकाल देतील तो निष्पक्ष असेल, कुठल्याही दबावाला बळी न पडता दिलेला असेल, याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणत असतील तर आम्ही थांबायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राम मंदिरावरून बडबड करणाऱ्या वाचाळवीरांना मी हात जोडून विनंती करतो की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवावा, कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी, असं नरेंद्र मोदी यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी म्हटलं होतं. त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, पण त्यांचा निशाणा शिवसेनेवर होता. एकीकडे भाजपा-शिवसेना युतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना, शिवसेनेला कमी जागा देऊन जास्त जागा घेण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असताना आणि त्यावरून शिवसेना नेते युती तोडण्याची धमकी देत असतानाच मोदींनी हा टोला हाणल्यानं राजकीय वर्तुळाचे कान टवकारले होते. आता उद्धव ठाकरे काय बोलणार, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव यांनी अगदीच शांतपणे मोदींच्या शब्दाला मान दिला. 

एकीकडे, भाजपाशी युती करणंच आपल्या हिताचं आहे हे ओळखून जागावाटपावरून शिवसेना नरमल्याची चिन्हं असताना, उद्धव यांनी मोदींच्या टिप्पणीवर घेतलेली ही सावध भूमिका सूचक मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

जो रामाचा नाही तो कामाचा नाही; शिवसेनेचा मोदींना सूचक इशारा

राम मंदिरावर बोलणाऱ्यांना नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती; शिवसेनाही लक्ष्य!

भाजपच्या मनात काही वेगळे असेल, तर तुम्हीही तयार राहा!

आजच्या 'टॉप-5' राजकीय बातम्या

उद्धव ठाकरेंची हळूच 'पलटी'; म्हणे, ठरलाच नव्हता फॉर्म्युला 'फिफ्टी-फिफ्टी'

मनसे 'सेन्चुरी'साठी तयार; राज ठाकरेंचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत स्वबळावर धावणार?

मराठी तरुणाईला उद्योजकतेचे धडे देणारे नामदेवराव 'वंचित बहुजन आघाडीत'

'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू'

घराणेशाहीला सांभाळूनच राष्ट्रवादीची तरुणांना संधी !

टॅग्स :उद्धव ठाकरेराम मंदिरनरेंद्र मोदी