Join us  

भाजपाने विद्यमान ११ आमदारांचे तिकीट कापले, ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:01 PM

कसबा येथील गिरीश बापट यांना खासदारकी मिळाल्यामुळे या जागेवरुन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

मुंबई - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु झाली असून भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपाने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली असून बहुतांश विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट दिलेलं आहे. तर 11 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. 

यामध्ये शहादा येथे राजेश पाडवी यांना तिकीट दिलं आहे तर विद्यमान आमदार उदेसिंग कोचरु पाडवी यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. तर कसबा येथील गिरीश बापट यांना खासदारकी मिळाल्यामुळे या जागेवरुन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

  • नवापूर- भरत गावित (विद्यमान आमदार - सुरुपसिंग नाईक)
  • अर्णी - संदीप प्रभाळकर धुर्वे ( विद्यमान आमदार - राजू तोडसम) 
  • मुखेड- तुषार राठोड (विद्यमान आमदार -गोविंद राठोड)
  •  विक्रमगड - हेमंत सावरा (विद्यमान आमदार - विष्णू सावरा) 
  • मुलंड - मिहिर कोटेचा (विद्यमान आमदार -सरदार तारा सिंग) 
  • माजलगाव- रमेश आडस्कर(विद्यमान आमदार -आर.टी देशमुख)
  • पुणे कॅन्टोन्मेंट- सुनिल कांबळे (विद्यमान आमदार - दिलीप कांबळे)
  • शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (विद्यमान आमदार- विजय काळे) 
  • कोथरुड - चंद्रकांत पाटील (विद्यमान आमदार - मेधा कुलकर्णी)
  • नागपूर दक्षिण- मोहन मेटे (विद्यमान आमदार - सुधाकर कोहळे)

वरील उमेदवारांना विद्यमान आमदारांच्या तिकीट कापून भाजपाकडून संधी देण्यात आली आहे. 

तर विद्यमान आमदार भुसावळ- संजय सावकारे, जळगाव शहर- सुरेश भोळे, अंमळनेर- शिरीश चौधरी, चाळीसगाव- मंगेश चव्हाण, मलकापूर- चैनसुख संचेती, चिखली- श्वेता महाले, खामगाव- आकाश फुंडकर, जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे, अकोट- प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा, अकोला पूर्व- रणधीर सावरकर, मूर्तिजापूर- हरिश पिंपळे, वाशिम- लखन मलिक, करंजा- डॉ. राजेंद्र पटणी, अमरावती- डॉ. सुनील देशमुख, दर्यापूर- रमेश बुंदिले, मोर्शी- डॉ. अनिल बोंडे, आर्वी- दादाराव केचे, हिंगणघाट- समीर कुणावर, वर्धा- पंकज भोयर, सावनेर- डॉ. राजीव पोतदार, हिंगणा- समीर मेघे, उमरेड- सुधीर पार्वे, नागपूर दक्षिण- मोहन मेटे, नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे, नागपूर मध्य- विकास कुंभारे, नागपूर पश्चिम- सुधाकर देशमुख, नागपूर उत्तर- मिलिंद माने, अर्जुनी-मोरगाव- राजकुमार बडोले दहिसर- मनीषा चौधरी, कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर, चारकोर- योगेश सागर, गोरेगाव- विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम- अमित साटम, विलेपार्ले - पराग अळवाणी, घाटकोपर पश्चिम - राम कदम, वांद्रे पश्चिम - आशीष शेलार, सायन कोळीवाडा - तामीळ सेल्वान, चिंचवड- लक्ष्मण जगताप, वडगाव शेरी- जगदीश मुळीक, खडकवासला- भीमराव तापकीर, पर्वती - माधुरी मिसाळ, हडपसर- योगेश टिळेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाकस्बा पेठशहादा