Vidhan Sabha 2019: चांदिवलीत ‘आम आदमी पक्षा’चा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:08 PM2019-09-25T23:08:48+5:302019-09-25T23:08:57+5:30

खान विरुद्ध खान : काँग्रेसचा गड कोण जिंकणार?

Maharashtra Vidhan Sabha 2019 Accelerate political movements after the announcement of 'Aam Aadmi Party' candidate in Chandivali | Vidhan Sabha 2019: चांदिवलीत ‘आम आदमी पक्षा’चा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग

Vidhan Sabha 2019: चांदिवलीत ‘आम आदमी पक्षा’चा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग

Next

- सचिन लुंगसे 

मुंबई : चांदिवली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार नसीम खान यांच्या विरोधात आता पहिल्यांदा दंड कोणी थोपटले असतील, तर ते ‘आप’च्या सिराज खान यांनी. आम आदमी पक्षाने नुकतीच आपली पहिली यादी जाहीर केली असून, चांदिवली विधानसभा मतदार संघातून आपने सिराज यांना उमेदवारी दिली आहे. परिणामी, पहिल्यांदा तरी येथे खान विरुद्ध खान असा सामना चर्चेत आला असून, जसजशा पुढील उमेदवाऱ्या घोषित होतील, तसतसे येथील ‘राज’कारण आणखी रंगणार आहे.

चांदिवलीत नसीन खान यांचे वर्चस्व आहे. १९९९ सालापासून खान येथे आमदार आहेत. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकींत शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी येथे नशीब आजमावले. त्यांचा निभाव लागला नाही. मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना दोन्ही निवडणुकांत मिळालेल्या मतांची बेरीज केली, तरीदेखील काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या पुढे हा आकडा जात नाही. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा आम आदमी पक्षाने चांदिवली विधानसभा मतदार संघातून सिराज खान यांचे नाव जाहीर केले आहे. सिराज खान हे उद्योजक आहेत. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या शिक्षणाकरिता ते कार्यरत असतात. सिराज खान हे आम आदमी पक्षाच्या वाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत आहेत.

दृष्टिक्षेप - २००९
काँग्रेसने नसीम खान यांना उमेदवारी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलीप लांडे यांना उमेदवारी दिली.
शिवसेनेने चित्रा सांगळे यांना उमेदवारी दिली.
१ लाख ५९ हजार ९७२ मतदारांनी मतदान केले.
नसीम खान यांना ८२ हजार ६१६ मते मिळाली.
दिलीप लांडे यांना ४८ हजार ९०१ मते मिळाली.
चित्रा सांगळे यांना २२ हजार ७८२ मते मिळाली.
नसीम खान हे ३३ हजार ७१५ मताधिक्यांनी विजयी झाले.

दृष्टिक्षेप - २०१४
काँग्रेसने नसीम खान यांना उमेदवारी दिली.
शिवसेनेने संतोष रामनिवास सिंग यांना उमेदवारी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ईश्वर दयाराम तावडे यांना उमेदवारी दिली.
एस. अण्णामलाई अपक्ष होते.
नसीम खान यांना ७३ हजार १४१ मते मिळाली.
शिवसेनेचे उमेदवार संतोष सिंग यांना ४३ हजार ६७२ मते मिळाली.
मनसे उमेदवार ईश्वर तायडेंना २८,६७८ मते मिळाली.
अण्णामलाई यांना २० हजार २६६ मते मिळाली.

कुणाची मते घटली;
कुणाची मते वाढली
२०१४ सालही चांदिवली विधानसभा मतदार संघातून नसीम खान यांचाच विजय झाला. मात्र, २००९च्या विधानसभेच्या तुलनेत २०१४ साली खान यांची मते सुमारे ९ हजारांनी घटली. २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१४ साली शिवसेनेची मते सुमारे २१ हजारांनी वाढली. २००९च्या तुलनेत २०१४ साली मनसेची मते २० हजारांनी घटली.

२०१९
चांदिवलीत काँग्रेसकडून नसीम खान यांचेच नाव आघाडीवर आहे.
शिवसेनेकडून दिलीप लांडे यांचे नाव आघाडीवर आहे.
मनसेतून एकाही नावाची चर्चा नाही.

जर आणि तर : जर युती झाली नाही, तर भाजपकडून येथे उत्तर भारतीय उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. मोहीत भारतीय आणि राजहंस सिंह यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली, तर त्याचा फटका काँग्रेसला बसेल.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Accelerate political movements after the announcement of 'Aam Aadmi Party' candidate in Chandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.