लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात जानेवारीमध्ये ३,१०० अपघात झाले. यात १,३१२ प्रवाशांचा मृत्यू झाला. जानेवारी २०२५ च्या तुलनेत नववर्षाच्या पहिल्या महिन्यात अपघातांमध्ये २ टक्क्यांनी तर मृतांच्या संख्येत ८ टक्क्यांनी घट झाली आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, वेगमर्यादा ओलांडणे, मद्यपान करून वाहन चालवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे आणि निष्काळजीपणे ओव्हरटेक करणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. ग्रामीण भागात तसेच महामार्गांवर सर्वाधिक अपघात झाले असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. राज्यातील अपघाताची संख्या २०३० पर्यंत ५० % कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभाग रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक भक्कमपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील आल्याचे अधिकारी म्हणाले. यासाठी परिवहन विभागाने अनेक उपाययोजना व प्रकल्प नियोजित केले आहेत.
ब्लॅक स्पॉट ठरतोय अपघातांना कारणीभूत आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ब्लॅक स्पॉट हे अपघातांचे महत्त्वाचे कारण असल्याने त्यावर उपाय म्हणून जिल्हा नियोजन व विकास परिषद (डीपीडीसी) योजनांतर्गत सुधारणा करण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यात रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालक-मालक यांच्यावर रडार व इंटरसेप्टर वाहनांच्या मार्फत कारवाई करण्यासाठी राज्यात ३३२ पथकांची निर्मिती केली आहे.
जनजागृतीवर भर द्या, तज्ज्ञांचा सल्लातज्ज्ञांच्या मते, रस्ते सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी, काळजीपूर्वक वाहनचालक प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम यावर भर देणे आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालय स्तरावर रस्ता सुरक्षेबाबत शिक्षण देण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
Web Summary : Maharashtra witnessed 3,100 accidents in January, claiming 1,312 lives. Over speeding, drunk driving, and neglecting safety gear are major factors. The transport department aims to reduce accidents by 50% by 2030, focusing on road safety measures, addressing black spots, and public awareness campaigns.
Web Summary : जनवरी में महाराष्ट्र में 3,100 दुर्घटनाएँ हुईं, जिनमें 1,312 लोगों की जान चली गई। तेज गति, शराब पीकर गाड़ी चलाना और सुरक्षा उपकरणों की उपेक्षा प्रमुख कारण हैं। परिवहन विभाग का लक्ष्य 2030 तक दुर्घटनाओं को 50% तक कम करना है, सड़क सुरक्षा उपायों, ब्लैक स्पॉट और जन जागरूकता अभियानों पर ध्यान केंद्रित करना है।