Maharashtra Politics ( Marathi News ) : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. या प्रकरणी काल विधिमंडळात विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरुन आमदार अनिल परब यांच्यावर टीका केली. या प्रकरणावरुन शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार चित्रा वाघ यांच्यावर टीका केली, या टीकेला वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.
वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार -महसूलमंत्री बावनकुळे
तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते मी असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. त्यावर, आकडा कमीच सांगितले असं लोकं म्हणतात, असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलं होतं. दरम्यान आता यावर चित्रा वाघ यांनीही ट्विट करुन सुषमा अंधारेंवर जोरदार प्रत्युत्तर दिले.
सुषमा अंधारे यांच्या टीकेवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर त्याला आम्ही देखील तसंच उत्तर देणार. कोणाच्या मुलाबाळावर बोलणं मलाच आवडत नाही, पण जर तुम्ही दहा वेळेस आमच्या कॅरेक्टरवर बोलत असाल तर त्याचं उत्तर आम्ही देणार. हम किसीको छेडते नही, पर अगर किसीने छेडा तो छोडते भी नही, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांना दिले.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
"कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी लोळत आल्या होत्या, अशी टीका सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही. वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा भाजप कसा वापर करून घेत आहे ते दिसत आहे. त्यांनी आकडा कमी सांगितला. महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे,राज्याच्या सभागृहाची परंपरा मोठी आहे. कालचा थयथयाट सभागृहाची गरिमा खाली आणणारा होता, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.