Join us  

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार; नेमका काय घडला चमत्कार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 12:42 PM

Anand mahindra thanks to CM uddhav thackeray : महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आणि त्यावरून उद्धव ठाकरे यांनीही नाव न घेता त्यांना टोला लगावला होता

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( CM uddhav thackeray ) यांनी काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आणि त्यावरून उद्धव ठाकरे यांनीही नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या या टोल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजपा यांनी टीका केली होती. पण, आनंद महिंद्रा यांनी सोमवारी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. ( Anand mahindra thanks to CM uddhav thackeray)  Maharashtra Lockdown: 'ब्रेक द चेन'... मुख्यमंत्री सचिवालयाकडून लॉकडाऊन अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात एसओपीही जारी करण्यात आली आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू झाले असून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. सीएमओकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महिंद्रा यांनी CMO Maharashtraचे ट्विटवर लिहिले की,''पूर्णपणे लॉकडाऊन न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो. अथक परिश्रम करणाऱ्या दुकान मालकांबद्दल मला वाईट वाटते. आता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरून ही निर्बंधही लवकरात लवकर उठवली जातील.''

काय म्हणाले होते आनंद महिंद्रा?लॉकडाऊनच्या मुद्द्यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे.  'उद्धवजी, समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया', असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी  ट्विट करत  ठाकरे सरकारला दिला आहे.
नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्यामहिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी  राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत दिलेल्या सल्ल्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असा टोला लगावला होता.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रआनंद महिंद्रा