महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 06:02 IST2025-12-11T06:01:20+5:302025-12-11T06:02:15+5:30
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, पुढील तीन दिवस राज्यभरात गारठा कायम राहील.

महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
मुंबई : मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून, अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, पुढील तीन दिवस राज्यभरात गारठा कायम राहील.
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
थंडगार वाऱ्यांमुळे हुडहुडी
हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी सांगितले, उत्तर भारतातून दक्षिणेकडे गार वारे वाहत आहे. या बोचऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमान घसरले आहे. गुरुवारी किमान तापमान आणखी घसरेल.
अहिल्यानगर ७.५
छ. संभाजी नगर १०.८
बीड ९
डहाणू १६.१
जळगाव ८
कोल्हापूर १४.६
महाबळेश्वर ११.६
मालेगाव ९.४
मुंबई १६.७
नांदेड १०.६
नंदुरबार १२.७
नाशिक ८.१
धाराशिव १२.६
पालघर १२.८
परभणी १०.५
सांगली १३
सातारा ११.६
ठाणे २१