मुंबईसह महाराष्ट्र गारठणार; आजपासून पुन्हा थंडीचा कडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 11:45 IST2025-12-07T11:45:15+5:302025-12-07T11:45:31+5:30

याबाबत हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी सांगितले, उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. येथील थंड वारे दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होईल.

Maharashtra including Mumbai will experience cold; Cold wave again from today | मुंबईसह महाराष्ट्र गारठणार; आजपासून पुन्हा थंडीचा कडाका

मुंबईसह महाराष्ट्र गारठणार; आजपासून पुन्हा थंडीचा कडाका

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. त्यामुळे मधल्या काळात गायब झालेली थंडी पुन्हा पडणार असून, हा आठवडा कडाक्याच्या थंडीचा असणार आहे.

याबाबत हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी सांगितले, उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. येथील थंड वारे दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होईल. याचा प्रभाव रविवारपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला जाणवू लागेल. सोमवारपासून यात आणखी भर पडेल आणि आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहील. विशेषत: १०, ११ आणि १२ डिसेंबर या तीन दिवशी किमान तापमानाचा पारा कमालीचा खाली येईल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात सगळीकडे थंडीचा कडाका असेल.

७ आणि ८ डिसेंबर रोजी विदर्भातील काही भागात शीत लहरीचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. आयएमडीने येत्या ४ आठवड्यांसाठी संपूर्ण देश पातळीवर हवामानाचा अंदाज सांगितला आहे. पहिले २ आठवडे उत्तरेकडील बहुतांश आणि काही इतर ठिकाणे वगळता अनेक ठिकाणी तापमान कमी असेल.

कृष्णानंद होसाळीकर, हवामान शास्त्रज्ञ

 

Web Title : मुंबई समेत महाराष्ट्र में शीतलहर का प्रकोप; तापमान में गिरावट

Web Summary : उत्तरी हवाओं के कारण मुंबई और महाराष्ट्र में सोमवार से शीतलहर का प्रकोप बढ़ने वाला है। तापमान में भारी गिरावट की संभावना है, मुंबई में 13 डिग्री सेल्सियस और अन्य शहरों में लगभग 6 डिग्री सेल्सियस तक तापमान गिर सकता है। यह ठंड पूरे सप्ताह रहेगी, खासकर 10-12 दिसंबर को।

Web Title : Maharashtra, Mumbai to Brace for Cold Wave; Temperature to Dip

Web Summary : Mumbai and Maharashtra are set to experience a cold wave starting Monday due to cold winds from the north. Temperatures are expected to drop significantly, with Mumbai potentially reaching 13°C and other cities around 6°C. The cold snap is predicted to last throughout the week, especially impacting December 10-12.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.