Join us  

Maharashtra Government: विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे नाना पटोले, सरकारची आज पुन्हा परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 6:05 AM

रविवारी पुन्हा एकदा सरकारची परीक्षा आहे.

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसने शनिवारी साकोलीचे आमदार नाना पटोले यांचे नाव जाहीर केले. भाजपने यापदासाठी मुरबाडचे किसन कथोरे यांना उमेदवारी दिली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत १ डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत असून, त्यानंतर ११ वाजता सभागृहात मतदान होईल. त्यामुळे रविवारी पुन्हा एकदा सरकारची परीक्षा आहे.अध्यक्षपद राष्टÑवादीने घ्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावे अशी मागणी काँग्रेसने सतत लावून धरली पण तिन्ही पक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेला, अध्यक्षपद काँग्रेसला व उपमुख्यमंत्रीपद राष्टÑवादीला असे ठरले आहे, त्यात बदल नको असे म्हणून हा वाद संपवण्यात आला. अध्यक्षपदाची निवडणूक एकतर्फी होईल असे दिसत असतानाही भाजपने किसन कथोरे यांना निवडणुकीत उतरवले आहे. अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते. पण भाजपची काही मते फोडायची, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. राष्टÑवादीच्या नेत्याने सांगितले की, आजचा निकाल पाहता, भाजप कदाचित निवडणुकीतून स्वत:हून माघार घेईल.

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडी