Join us  

‘दोन दिवस थांबा’! अजित पवार यांचे सुचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 5:43 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी मनधरणीसाठी आलेल्या नेत्यांना ‘दोन दिवस थांबा’ एवढेच सूचक उत्तर दिल्याने अनेक तर्कविर्तक लढविले जात आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी मनधरणीसाठी आलेल्या नेत्यांना ‘दोन दिवस थांबा’ एवढेच सूचक उत्तर दिल्याने अनेक तर्कविर्तक लढविले जात आहेत.उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच अजित पवारांनी विधानभवनात पाऊल ठेवले. स्मृतीदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर ते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात चार तास बसून होते. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला नाही. राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांनी भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. निवडणूका, सत्ता येते, जाते पण नाती कायम असतात. ती टिकवायची असतात, असे त्यांनी पवार यांना समजावण्याचा प्रयत्न केला.गेली दोन दिवस अजित पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न होत आहे. कालही सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे आदींनी त्यांची भेट घेतलीं होती. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता. आज मात्र ‘दोन दिवस थांबा’! असे उत्तर अजित पवार यांनी दिले आहे.

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019