Join us  

Maharashtra Election 2019 : ईव्हीएम मशीन भोवती कडा पहारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 8:48 PM

ईव्हीएम मशीन वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्रॉँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला

मुंबई : पूर्व उपनगरातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अणूशक्तीनगर, मानर्खुद-शिवाजीनगर व घाटकोपर (पू) या मतदारसंघातील ईव्हीएम मशीन वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्रॉँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला असून वरिष्ठ अधिका-याशिवाय इतरांना त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.तीनही मतदार संघातील मतदान सोमवारी सुरळीतपणे पार पडले. त्यानंतर सर्व मतदारसंघ निहाय मशीन्स एकत्र करुन स्ट्रॉँगरुममध्ये ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019एव्हीएम मशीनव्हीव्हीपीएटी