Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर महाधिवक्त्यांनी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 17:29 IST

शिवसेना - भाजप यांच्यातील सत्तासंघर्षामुळे हा गुंता अधिकाधिक वाढत आहे.

ठळक मुद्देमहाधिवक्ता हा राज्याचा घटनात्मक आणि कायदेशीर सल्लागार असतो. विद्यमान सरकारची मुदत ९ नोव्हेंबरला संपणार असताना अद्यापही नवे सरकार अस्तित्वात येण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक जटील होत चालला आहे. विद्यमान सरकारची मुदत ९ नोव्हेंबरला संपणार असताना अद्यापही नवे सरकार अस्तित्वात येण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. शिवसेना - भाजप यांच्यातील सत्तासंघर्षामुळे हा गुंता अधिकाधिक वाढत आहे. त्यामुळे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. महाधिवक्ता हा राज्याचा घटनात्मक आणि कायदेशीर सल्लागार असतो. राज्यातील सर्वात ज्येष्ठ सरकारी वकिलास महाधिवक्ता म्हणून संबोधले जाते. महाधिवक्त्याची निवड ही राज्यपालांच्या कार्यकक्षेत येते. राज्यघटनेच्या कलम १६५ मधील अनुच्छेदानुसार राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करण्यात येते. अनुभवी आणि पात्र वकिलासच महाधिवक्ता म्हणून नेमले जाते. आशुतोष कुंभकोणी हे सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. उच्च न्यायालयात १० वर्षे वकिली किंवा राज्यात १० वर्षे न्यायिक अधिकाराचा अनुभव ही पात्रता महाधिवक्ता या पदासाठी गृहित धरली जाते. राज्यपालांची मर्जी असेपर्यंतच महाधिवक्ता हे पदावर राहू शकतात. विद्यमान सरकारची मुदत ९ नोव्हेंबरला संपत आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019सरकारमुंबईवकिल