Maharashtra Election 2019: Shiv Sena challenge of old alliance | Maharashtra Election 2019 : जुन्या मित्रपक्षाचे शिवसेनेला आव्हान
Maharashtra Election 2019 : जुन्या मित्रपक्षाचे शिवसेनेला आव्हान

मुंबई : महापालिकेत गेली काही वर्षे युतीमध्ये साथ देणाऱ्या अखिल भारतीय सेनेबरोबर शिवसेनेचे सूर बिघडले. या पक्षाच्या एकमेवर नगरसेविका असलेल्या गीता गवळी यांनी २०१७च्या निवडणुकीत भाजपला समर्थन दिले आहे. भाजपच्या शिवसेनेबरोबर विधानसभेसाठी युती झाल्यानंतरही अभासेने युतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना आव्हान दिले आहे.
अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेच्या दोन नगरसेविकांचा शिवसेनेला या आधी पाठिंबा होता. यासाठी गीता गवळी यांना स्थायी समितीचे सदस्यत्व, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्षपद अशी काही महत्त्वाची पदेही शिवसेनेने दिली होती, परंतु २०१७च्या निवडणुकीत गणित बिघडले आणि गीता गवळी यांनी भाजपला समर्थन दिले.
अभासेच्या गीता गवळी आणि सेनेच्या यामिनी जाधव यांच्याखेरीज या मतदार संघात विद्यमान आमदार व एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण, काँग्रेसचे मधुकर चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Shiv Sena challenge of old alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.