Join us  

पावसामुळे मतदान केंद्रात चिखल, तर काही मशीनमध्ये झाला बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 3:18 AM

Maharashtra Election 2019: कुर्ला विधानसभेच्या स्वामी विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल तयार झाला होता.

मुंबई : कुर्ला विधानसभेच्या स्वामी विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल तयार झाला होता. मतदान करण्यासाठी जाताना मतदारांची गैरसोय झाली. मतदारांनी चिखलात उभे राहूनच रांगा लावल्या होत्या.

चिखलामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असल्याने मतदार जपून पाऊल टाकत होते. तर काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होता. त्यामुळे १७ मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्या ठिकाणच्या मशीन तत्काळ बदलण्यात आल्या असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकीकडे मुंबईकर मतदानाकडे पाठ फिरवत असताना अपघातग्रस्त आणि दिव्यांगांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांचा दुपारपर्यंत कमी प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर मतदार वाढले.

अपघातानंतरही बजावला मतदानाचा हक्क

दिलीप सोडा यांचा गुरुवारी अपघात झाला होता. त्यांच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले होते. त्यामुळे बाहेर फिरू नये, असे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु तरीही त्यांनी मुलांसोबत दुचाकीवर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019पाऊसमतदान