Join us  

Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 5:14 AM

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना किमान तीनवेळा निवडणूक खर्चाबाबतच्या दैनंदिन नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे.

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या तीन उमेदवारांविरोधात निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. अभिजीत बिचकुले, विश्राम पाडम आणि महेश खांडेकर या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नाही. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना किमान तीनवेळा निवडणूक खर्चाबाबतच्या दैनंदिन नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या दिवशी उमेदवार अथवा उमेदवाराच्या प्रतिनिधीने निवडणूक खर्चाच्या नोंदवहीसह तपासणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. मात्र या उमेदवारांचया नोंदवह्या सादर झाल्या नाहीत. त्यामुळे तिघांविरोधात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :वरळीमुंबईमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019