लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:05 AM2021-05-19T04:05:52+5:302021-05-19T04:05:52+5:30

एवढ्या माेठ्या संख्येने लस देणारे देशातील एकमेव राज्य लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी महाराष्ट्राने २ ...

Maharashtra crosses 2 crore mark in vaccination | लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा

Next

एवढ्या माेठ्या संख्येने लस देणारे देशातील एकमेव राज्य

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी महाराष्ट्राने २ कोटींचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. साेमवारी राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९,६९९ नागरिकांना लस देण्यात आली. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून, महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले.

राज्यात आतापर्यंत २३ लाख २३ हजार ३२२ आरोग्य कर्मचाऱ्यांना, १८ लाख ५० हजार ७७३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना, १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार ६८५ नगारिकांना, तर ४५ हून अधिक वय असणाऱ्या १५ लाख २६ हजार ५२८ जणांना लस देण्यात आली.

* जिल्हानिहाय आकडेवारी

मुंबई - २८ लाख ९२ हजार ४५७

पुणे - २६ लाख १७ हजार ५३

ठाणे - १५ लाख २८ हजार ७३४

नागपूर - १२ लाख २० हजार ७५२

नाशिक - ९ लाख ९ हजार ३२३

--------------------------------

Web Title: Maharashtra crosses 2 crore mark in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.