Join us  

Maharashtra CM: चिंता करू नका, सरकार आपलंच येणार - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 6:09 AM

‘चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला.

मुंबई : ‘चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. तुम्ही मुंबईला आता यायचं नाही. इथून निघून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा अन् त्यांचं दु:ख हे आपलं दु:ख असल्याचं मानून कामाला लागा, असे ते म्हणाले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सर्व माजी मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत फडणवीस म्हणाले, सत्तास्थापनेबाबत येत असलेल्या कोणत्याही बातम्यांनी तुम्ही विचलित होऊ नका. योग्यवेळी योग्य निर्णय होईल. सरकार आपलेच येणार आहे. भाजप वगळता कोणतेही सरकार होऊ शकत नाही. तुम्ही मुंबईत थांबू नका, पुढचे दोनतीन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावरच तुम्ही दिसले पाहिजे. शेतकºयांना भक्कम मदत मिळेल यावर जातीने लक्ष द्या.शिवसेनेवर फडणवीस यांनी कोणतीही टीका केली नाही, मात्र अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मित्रपक्षाला अधिक जागा मिळण्यात भाजपचे योगदान मोठे आहे. भाजपचे नेते सेना उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक मतदारसंघांमध्ये गेले पण सेनेचे नेते भाजपसाठी आले नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला. तीन पक्षांचे सरकार चालू शकत नाही. तीन पक्षांचे सरकार झाले तरी ६ महिने टिकणार नाही. त्यामुळे आपलेच सरकार येणार, असे फडणवीस म्हणाले. यशाने हुरळून जावू नका, जनतेशी असलेला संपर्कच तुम्हाला इथवर घेऊन आला. त्यामुळे कायम जनतेत राहा, हवेत राहू नका, या शब्दात फडणवीस यांनी पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांचे कान टोचले. चंद्रकांत पाटील यांनी अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाल्याचेसांगून त्या संदर्भातील आकडेवारी दिली.तीन अंकी नाटकावर लक्षमुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीनंतर सांगितले की, सत्तास्थापनेच्या सध्या सुरू असलेल्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सरकार स्थापनेस एकत्र आलेल्या पक्षांची कसरत आम्ही बघत आहोत.>‘राजकारणात अन् क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते’राजकारण आणि क्रिकेट हे अनिश्चिततांचे खेळ असून त्यात केव्हाही काहीही होऊ शकतं, असं विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे आयोजित कार्यक्रमात केलं. ते हसून म्हणाले की, मी हे महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात बोलतोय असं नाही, मात्र राजकारण अन् क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. गडकरी यांच्या या विधानाचा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होऊ शकते, असा घेतला जात आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाभाजपा