Join us

मंत्र्यांना खातं कळतं का? आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले,"तुमच्या वडिलांना मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:39 IST

आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना त्यांचे खातं कळत नसल्याचे म्हटलं.

Gulabrao Patil on Aditya Thackeray: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या वेळी विधानसभेमध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात तू तू मैं मैं पाहायला मिळाली. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतला होता. मंत्र्यांना खातं कळत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी खातं कळतं म्हणून तुमच्या वडिलांना मंत्रिपद दिलं होतं असा टोला लगावला आहे.

"विधिमंडळात आम्ही विरोधक असलो तरी सत्ताधाऱ्यांना आम्ही सूचना करु आणि सहकार्य करु असं म्हटलं होतं. इथे अनेकजण अभ्यास करुन येतात. मुख्यमंत्री, उपमु्ख्यमंत्री स्वतः उत्तरे देतात. अध्यय महोदयांनी यासंदर्भात बैठक बोलवायला हवी कारण मंत्री महोदय प्रत्येक उत्तराला वेगळं उत्तर देत आहेत. आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे. आपण बोटं दाखवून चालणार नाही. त्यामुळे मंत्र्यांना खातं कळलंय की नाही हा मूळ विषय इथे राहतो. मंत्र्यांनी खात्याचा अभ्यास करावा. सत्ताधारी पक्षाचेही अनेक प्रश्न आहेत पण मंत्री उत्तरं देऊ शकत नाही. या प्रश्नाचे उत्तर राखीव ठेवा आणि मंत्र्यांना अभ्यास करुन उत्तर द्यायला सांगा," अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. "त्यांच्या वडिलांना मी कळलो होतो म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहिती नाही," असा पलटवार गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर केला. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2025आदित्य ठाकरेगुलाबराव पाटील