Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 05:39 IST

धमकी देणारे पत्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या कार्यालयात आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई :

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना तुकडे तुकडे करून समुद्रात फेकू, अशा आशयाची धमकी देणारे पत्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या कार्यालयात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयाच्या पत्रपेटीत शुक्रवारी सकाळी एक निनावी पत्र आले. ज्यात त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हे पत्र हाताने लिहिलेले असून, त्यात शेलारांसह भाजप आणि शिंदे गटाविरोधात असभ्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. पत्र मिळताच शेलार यांनी वांद्रे पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करून अधिक तपासास सुरुवात करण्यात आली आहे. पत्रातील हस्ताक्षर कोणाचे आहे, तसेच ते कोणत्या टपालातून आले याचा शोध घेत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शेलार यांना गेल्या वर्षीही जानेवारीतजिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

टॅग्स :आशीष शेलार