Maharashtra Assembly Election Result 2024: मुंबई उत्तर कांदिवली विधानसभा मतदार संघात गेल्या १० वर्षांपासून भाजपचे अतुल भातखळकर यांचं वर्चस्व आहे. यावेळीही निवडणुकीत भाजपकडून अतुल भातखळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला मिळाली असल्यानं त्यांच्याकडून कालू बढेलिया हे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतलेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या अतुल भातखळकर यांनी विजयाची हॅटट्रिक मारली आहे.
२००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी ही जागा काँग्रेसनं मिळवली होती. या ठिकाणी काँग्रेसचे ठाकूर रमेश सिंह यांचा विजय झाला होता. त्यांच्यासमोर भाजपच्या जयप्रकाश ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु २०१४ मध्ये जयप्रकाश ठाकूर यांचं तिकिट कापून अतुल भातखळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर भातखळकर यांनी ठाकूर रमेश सिंह यांचा पराभव केला. तसंच २०१९ च्या विधानसभा निवडणुकांतही भातखळकर यांनी बाजी मारली.
दरम्यान, यावेळी भातखळकर विजयाची हॅटट्रिक साधणार की कालू बढेलिया त्यांचा विजयी रथ रोखणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु आता भातखळकर यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या अजंता यादव यांचं आव्हान होतं.