२०१९, २०२४ च्या निवडणुकीत सेम टू सेम ५०३७ मते! वर्सोव्यात मनसेकडून EVM विरोधात बॅनरबाजी
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 4, 2024 16:11 IST2024-12-04T16:10:19+5:302024-12-04T16:11:11+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दहा दिवस उलटून गेले आहेत. महायुतीला अपेक्षेपेक्षाही प्रचंड मोठे यश मिळाले आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी, मनसे आणि वंचित उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर पराभव देखील झाला आहे.

२०१९, २०२४ च्या निवडणुकीत सेम टू सेम ५०३७ मते! वर्सोव्यात मनसेकडून EVM विरोधात बॅनरबाजी
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दहा दिवस उलटून गेले आहेत. महायुतीला अपेक्षेपेक्षाही प्रचंड मोठे यश मिळाले आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी, मनसे आणि वंचित उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर पराभव देखील झाला आहे.यामुळे आता या पराभवाला ईव्हीएम जबाबदार असल्याची सर्वच पक्षांकडून तक्रार केली जात आहे.
आता मनसेकडून देखील ईव्हीएम विरोधात आक्रमक पवित्रा घेत वर्सोवा विधानसभेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. मनसेचे येथील पराभूत उमेदवार संदेश देसाई यांनी बॅनरबाजी केली आहे. आपल्याला २०१९ च्या निवडणुकी इतकीच सेम टू सेम ५०३७ मते २०२४ च्या निवडणुकीत देखील तितकीच मते मिळाल्याने ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा आरोप देसाई यांनी केला. यासंदर्भात आपण निवडणूक अधिकाऱ्याकडे लवकरच तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.