Join us

Mumbai Fire, BREAKING: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:27 IST

मुंबईतील कांजुरमार्ग येथील रहिवासी इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

मुंबई-

मुंबईतील कांजुरमार्ग येथील रहिवासी इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.  विक्रोळी कांजूरमार्ग पूर्व येथील एनजी रॉयल पार्कमधील एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीनं रौद्र रुप धारण केलं असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार, कांजूरमार्ग पूर्वेकडील एनजी रॉयल पार्कमधील २ बी पार्कमधील इमारतीत ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच बंब पोहोचले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईआग