Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 22:52 IST

Mahaparinirvan Din 2025 Central Railway Special Local Train Time Table: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

Mahaparinirvan Din 2025 Central Railway Special Local Train Time Table: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी ५/६.१२.२०२५ (शुक्रवार – शनिवार)च्या मध्यरात्री  परळ– कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान १२ अतिरिक्त उपनगरी विशेष लोकल सेवा चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या उपनगरी विशेष लोकल ट्रेन सर्व स्थानकांवर थांबा देतील. 

सर्व संबंधितांनी याची कृपया नोंद घ्यावी व या सुविधेचा लाभ घ्यावा. प्रवाशांना गैरसोयी टाळण्यासाठी योग्य व वैध तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन करीत आहे. तपशील पुढीलप्रमाणे...

मुख्य मार्ग – अप विशेष गाड्या (कल्याण/ठाणे/कुर्ला– परळ मार्ग)

- कुर्ला – परळ ही विशेष गाडी कुर्ला येथून ००.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे ०१.०५ वाजता पोहोचेल.

- कल्याण – परळ ही विशेष गाडी कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि परळ येथे ०२.२० वाजता पोहोचेल.

- ठाणे – परळ ही विशेष गाडी ठाणे येथून ०२.१० वाजता सुटेल आणि परळ येथे ०२.५५ वाजता पोहोचेल. 

मुख्य मार्ग – डाउन विशेष गाड्या (परळ - कुर्ला/ठाणे/कल्याण मार्ग)

- परळ – ठाणे/कल्याण ही विशेष गाडी परळ येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०१.५५ वाजता पोहोचेल. 

- परळ – कल्याण ही विशेष गाडी परळ येथून ०२.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.५० वाजता पोहोचेल.

- परळ – कुर्ला ही विशेष गाडी परळ येथून ०३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.२० वाजता पोहोचेल.

हार्बर मार्ग – अप विशेष गाड्या (पनवेल/वाशी – कुर्ला मार्ग)

- वाशी – कुर्ला ही विशेष गाडी वाशी येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल. 

- पनवेल – कुर्ला ही विशेष गाडी पनवेल येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.

- वाशी – कुर्ला ही विशेष गाडी वाशी येथून ०३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.४० वाजता पोहोचेल.

हार्बर मार्ग – डाउन विशेष गाड्या (कुर्ला– वाशी/पनवेल मार्ग)

- कुर्ला – वाशी ही विशेष गाडी कुर्ला येथून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०३.०० वाजता पोहोचेल.

- कुर्ला – पनवेल ही विशेष गाडी कुर्ला येथून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहोचेल.

- कुर्ला – वाशी ही विशेष गाडी कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०४.३५ वाजता पोहोचेल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Central Railway to Run Special Local Trains for Mahaparinirvan Din

Web Summary : On Mahaparinirvan Din 2025, Central Railway will operate 12 extra local train services between Kurla-Vashi/Panvel and Parel-Kalyan during the night of December 5-6 for passenger convenience. These special local trains will halt at all stations. Passengers are requested to travel with valid tickets.
टॅग्स :मध्य रेल्वेरेल्वे प्रवासीट्रॅव्हल टिप्सभारतीय रेल्वेरेल्वेमुंबई लोकल