म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:53 IST2025-07-13T06:53:09+5:302025-07-13T06:53:35+5:30

Mhada Lottery 2025: सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गो-लाइव्ह कार्यक्रमांतर्गत १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे.

Mahada Lottery 2025 Latest News: MHADA's advertisement has arrived; Lottery of 5,285 houses, will be announced on 14 july 2025 | म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (पालघर) येथील विविध योजनेंतर्गत ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग),  कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गो-लाइव्ह कार्यक्रमांतर्गत १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे.

कोकणची सोडत पाच घटकांमध्ये आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३ हजार २ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेंतर्गत १ हजार ६७७ सदनिका, कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० % परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी आहेत. तसेच, ७७ भूखंड विक्रीसाठी आहेत.

असे आहे वेळापत्रक
१३ ऑगस्ट : रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.
१४ ऑगस्ट : रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. 
२१ ऑगस्ट : सायंकाळी ६ वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी  प्रसिद्ध होईल.
२५ ऑगस्ट :  सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
१ सप्टेंबर : सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी सायंकाळी ६ वाजता  प्रसिद्ध होईल.
३ सप्टेंबर : सकाळी १० वाजता 
पात्र अर्जाची संगणकीय सोडत 
ठाणे येथील डॉ. काशीनाथ 
घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाईल.

सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ, दलाल, मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच, अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोंकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.
रेवती गायकर, 
मुख्य अधिकारी, कोकण मंडळ

Web Title: Mahada Lottery 2025 Latest News: MHADA's advertisement has arrived; Lottery of 5,285 houses, will be announced on 14 july 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.