टेरेसला बनविले रेस्टाॅरंट; जागा मालकाला पालिकेची नोटीस, कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 13:12 IST2023-10-13T13:12:44+5:302023-10-13T13:12:44+5:30
याप्रकरणी जागा मालकाला पालिकेने नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे.

टेरेसला बनविले रेस्टाॅरंट; जागा मालकाला पालिकेची नोटीस, कारवाईचा इशारा
मुंबई : मुलुंड पश्चिममध्ये एका दुकानावरील टेरेसला अनधिकृतपणे हॉटेलसाठी रूम तयार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जागा मालकाला पालिकेने नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे.
एमजी रोड परिसरातील मुन्शी को. ऑप हौसिंग इस्टेटमध्ये हा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी बी मॅड नावाने रेस्टाॅरंट सुरू आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या टेरेसला भिंत उभारून हॉटेलसाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. याप्रकरणी गजेंद्र पिपाडा यांनी तक्रार केली होती. टी विभागाचे सहायक अभियंता सत्यम लगडे यांनी सांगितले, लवकरच कारवाई करण्यात येईल.