Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:45 IST

सोशल मीडियावर अनोळखी तरुणीशी ओळख झाल्यानंतर ५० वर्षीय उद्योजक मोठ्या प्रकरणात अडकला.

सोशल मीडियावर मैत्री करताना जपून करा, असे पोलीस सातत्याने सांगत असतात. असं असतानाही अनेकजण सोशल मीडियावरील मैत्रीच्या जाळ्यात अडकतात. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. एका महिलेने व्हॉट्सअपवरून व्हिडीओ कॉल केला आणि विवस्त्र होत त्याच्यासोबत व्हिडीओ तयार केला. याचाच वापर करत महिलेने उद्योजकाला अडकवले.

गोरेगाव परिसरात ही घटना घडली आहे. फसवणूक झाल्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू झाल्यानंतर उद्योजकाने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, याबद्दलची तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. 

अनोळखी महिलेशी ओळख

पोलिसांनी सांगितले की, उद्योजकाची फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी ओळख झाली होती. महिलेने उद्योजकासोबत मैत्री केली. 

मैत्री करत उद्योजकाचा विश्वास संपादन केला. त्यामुळे उद्योजकाने त्यांचा मोबाईल क्रमांक महिलेला दिला. त्यानंतर महिलेने एक व्हॉट्सअपवरून व्हिडीओ कॉल केला. 

दोघे बोलत असतानाच अचानक महिलेने अचानक कपडे काढायला सुरूवात केली. महिलेने कपडे काढल्याचे बघून उद्योजकाने लगेच तो व्हिडीओ कॉल बंद केला. 

व्हॉट्सअपवरून व्हिडीओ कॉल

त्यानंतर काही दिवसांनी महिलेने उद्योजकाला कॉल केला. त्यांच्यातील संभाषणाची व्हिडीओ कॉलची क्लिप व्हायरल करणार असल्याची महिलेने दिली. वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमक्या द्यायला सुरूवात केली. मी पोलीस खात्यात अधिकारी असल्याचेही महिलेने व्यक्तीला भासवले. त्या भीतीमुळे उद्योजकाने सुरुवातील १५ हजार पाठवले. 

आठवडाभरानंतर पुन्हा महिलेने कॉल केला. सतत धमक्या देत महिलेने १ लाख २० हजार रुपये उकळले. इतके पैसे देऊनही महिला थांबत नसल्याचे उद्योजकाच्या लक्षात आले. महिला सातत्याने पैसे मागू लागल्याने उद्योजकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai businessman trapped after nude video call; blackmailed for money.

Web Summary : A Mumbai businessman was blackmailed after a woman befriended him on Facebook, made a nude video call, and threatened to release the recording. He paid ₹1.35 lakh before reporting to police.
टॅग्स :हनीट्रॅपमुंबई पोलीसगुन्हेगारीलैंगिक छळ