Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांची आज मुलाखत; दिलीप माजगावकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 06:21 IST

ठाण्यात रंगणाऱ्या ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळ्यात रसिकांना हा अभूतपूर्व योग अनुभवता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेचे लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची अभिनेते मकरंद अनासपुरे घेणार असलेली खुमासदार मुलाखत... मराठी-हिंदी चित्रपटांत अभिनयाचा अमिट ठसा उमटविलेले अभिनेते सचिन खेडेकर यांची ‘माझ्या वाचनाची गोष्ट’ आणि राजहंस प्रकाशनचे प्रमुख दिलीप माजगावकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान... ठाण्यात रंगणाऱ्या ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळ्यात रसिकांना हा अभूतपूर्व योग अनुभवता येणार आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मंगळवार, २४ मार्च रोजी सायंकाळी ५:४५ वाजता हा देखणा सोहळा पार पडेल. विविध साहित्य प्रकारांत ठसा उमटविणारे लेखक, कवी व पुस्तकांनाही गौरविण्यात येईल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तर ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ सोहळ्याचे हे सातवे वर्ष आहे.यावेळी ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांची ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर हे मुलाखत घेणार आहेत. बातमी लेखन, संपादन या विषयाचे गाढे अभ्यासक, पत्रकारितेची पदवी न घेताही अनेकांना या क्षेत्रात नावलौकिक मिळवून देणारे आणि ‘झुंबर’ पुस्तकाचे लेखक राजेंद्र दर्डा यावेळी पत्रकारितेतील स्थित्यंतरांची मांडणी करतील. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत.

राजू बाविस्कर यांचा विशेष सत्कार

नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेले चित्रकार व लेखक राजू बाविस्कर (पुस्तक : काळ्यानिळ्या रेषा) यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला : लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रम  सर्वांसाठी खुला आहे. विजेत्या लेखकांची पुस्तके कार्यक्रमाच्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील. वाचकांना विजेत्या लेखकांची पुस्तकावर स्वाक्षरीही घेता येईल.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sachin Goswami, Sachin Mote Interview; Dilip Majgaonkar Honored at Lokmat Event

Web Summary : Sachin Goswami, Sachin Mote interview, and Dilip Majgaonkar's honor highlight Lokmat Literary Awards. The event features discussions, book releases, and recognitions of literary figures and their works in Thane.
टॅग्स :लोकमत इव्हेंटलोकमतमराठी अभिनेता