Join us  

‘लोकमत महामॅरेथॉन’ : रजिस्ट्रेशन करा mahamarathon.com/pune/ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 1:35 AM

‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  mahamarathon.com/pune/ या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करता येईल.

पुणे  - ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  mahamarathon.com/pune/ या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करता येईल.व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून या शर्यतीचा थरार रंगणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेपर्यंत आहे.‘लोकमत महामॅरेथॉन’ या ‘सर्किट रन’मध्ये राज्यातील ५ शहरांचा समावेश आहे. अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम राबविणारे ‘लोकमत’हे एकमेव वृत्तपत्र आहे. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर शहरांत झालेल्या या शर्यतीला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभला आहे. पुण्यात या ‘सर्किट रन’चा समारोप होत आहे.‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे ब्रीदवाक्य असलेली सर्किट रनच्या समारोपाची ही महामॅरेथॉन अनेक बाबींमध्ये आपले वेगळेपण अधोरेखित करणारी आहे. यात विजेत्यांना सहा लाख रुपयांची बक्षिसे तर मिळणार आहेतच; पण त्याहीपेक्षा वेगळे आहे ते १०, तसेच २१ किलोमीटरची शर्यत पूर्ण करणाऱ्यांना मिळणारे पदक. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांची भल्या पहाटेपासून धावपळ सुरू होते. वृत्तपत्रविके्रत्यांच्या कार्याचा सन्मान करणारे हे पदक खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या ‘लिमिटेड एडिशन’ पदकामुळे १० व २१ किमीची शर्यत धावपटूंचे लक्ष वेधून घेत आहे.या खास पदकाचे अनावरण पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या हस्ते सोमवारी ‘लोकमत’च्या कार्यालयात झाले. ‘लोकमत’चे संपादक प्रशांत दीक्षित, महाव्यवस्थापक मिलन दर्डा आणि उपमहाव्यवस्थापक योगेंद्र मिश्रा यांनी स्वागत केले.पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रयपिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, गणेश चव्हाण, अमित जाधव, अनंता केंडे, यतीन चौधरी, केदार मारणे, यशवंत वादवणे, सोमनाथ कोकणे, सलीम सय्यद, ‘कॉलेज डायरी’ चित्रपटातील अभिनेते अविनाश खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.3 कि.मी. (फॅमिली रन)३ कि. मी.च्या श्रेणीत सहकुटुंंब धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.कुटुंबातील सदस्याला प्रत्येकी ४०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.या अंतर्गत एक कुटुंबाला गुडी बॅग,टी-शर्ट, पदक आणि अल्पोपाहार देण्यात येईल.5 कि.मी. (फन रन)५ कि.मी.च्या श्रेणीत १२ वर्षांवरील एका व्यक्तीला धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.यासाठी धावपटूला ४९० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.या अंतर्गत धावपटूला गुडी बॅग,टी-शर्ट, पदक आणि अल्पोपाहार देण्यात येईल.10 कि.मी. (पॉवर रन)10 कि. मी.च्या श्रेणीत १६ वर्षांवरील एका व्यक्तीला धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.यासाठी धावपटूला ११०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.या अंतर्गत धावपटूला गुडी बॅग, टी-शर्ट, डिजिटल प्रमाणपत्र, फिनीशर्स पदक, टायमिंग चिप आणि अल्पोपाहार देण्यात येईल.21 कि.मी. (हाफ मॅरेथॉन)सर्वसामान्य नागरिक२१ कि. मी.च्या श्रेणीत १८ वर्षांवरील एका व्यक्तीला धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.यासाठी धावपटूला ११०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.या अंतर्गत धावपटूला गुडी बॅग, टी-शर्ट, डिजिटल प्रमाणपत्र, फिनीशर्स पदक, टायमिंग चिप आणि अल्पोपाहार देण्यात येईल.सैैन्यदल२१ कि. मी.च्या श्रेणीत सेनादलातील एका व्यक्तीला धावण्याचा आनंद घेता येऊ शकेल.यासाठी धावपटूला १००० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.या अंतर्गत धावपटूला गुडी बॅग, टी-शर्ट, डिजिटल प्रमाणपत्र, फिनीशर्स पदक, टायमिंग चिप आणि अल्पोपाहार देण्यात येईल.यांच्या सहयोगाने रंगणार स्पर्धाअ‍ॅकॅडमिक पार्टनर- सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सफाउंडेशन पार्टनर- फिनोलेक्स पाइप्स, मुकुल माधव फाउंडेशनस्पाईसेस पार्टनर- सुहानाफर्टिलिटी हेल्थ पार्टनर-झेनिथ अ‍ॅडव्हान्स्ड फर्टिलिटी सेंटरक्लासेस पार्टनर- चाटे (द सिम्बॉल आॅफ मेरिट)ट्रॅव्हल पार्टनर- एसटीए हॉलिडेजवेलनेस पार्टनर- मल्टिफीटमेडिकल पार्टनर- संचेतीअ‍ॅग्रो पार्टनर - आदिनाथ अ‍ॅग्रो, सुरभीआउटडोर पार्टनर- धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.फिटनेस पार्टनर- बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनरेडिओ पार्टनर- ९३.५ रेड एफएम, बजाते रहोहॉस्पिटॅलिटी पार्टनर - द आॅर्किडटी-शर्ट पार्टनर- संदीप युनिव्हर्सिटीफूड अँड बेव्हरेज पार्टनर- फ्रूट एक्सरेस मॅनेजमेंट पार्टनर- रिलॅक्स झीलपेन रीलिफ पार्टनर- विंटोजिनोडीजिटल पार्टनर- एलिफंट अँड अ‍ॅन्टस्डीजिटल पार्टनर- पुणे इट आऊटस्हेल्थ फूड पार्टनर- नेचर्स लाइफस्टाइल कॅफेएनजीओ पार्टनर- रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१बुकिंग पार्टनर- टाऊनस्क्रिप्टविशेष सहकार्यपुणे महानगरपालिका पुणे मेट्रोपुणे पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीसपुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटकॉर्पोरेशन लिमिटेडनोंदणीसाठी ७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० दरम्यान 020-66848586या क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :पुणेमॅरेथॉन