वेसावा विद्या मंदिरात मतदानाला लागली रांग; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 20, 2024 13:00 IST2024-05-20T12:58:55+5:302024-05-20T13:00:14+5:30
मुंबईत मतदान केंद्रावर मतादारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

वेसावा विद्या मंदिरात मतदानाला लागली रांग; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मनोहर कुंभेजकर, मुंबई : 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील तसेच 164 वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील तर 198 वेसावा विद्यामंदिर एकूण 10 मतदान बूथ आहेत. सकाळ पासूनच येथे मतदारांची गर्दी होती. तर अल्पसंख्यांक बांधव देखील कुटुंबासह मतदानाला उतरले होते.
येथे बूथ क्रमांक 198 वर मतदारांची जास्त गर्दी होती.महिला व पुरुषांची रांग वेगळी होती.एक वेळेस एक पुरुष आणि एक महिलेला मतदान कक्षात प्रवेश दिला जात असल्याने मतदान करायला किमान 40 ते 50 मिनीटे लागत होती. उकाड्याने मतदारांचे तर रांगेत घामटे निघाले. याठिकाणी नंतर बाहेर पंख्याची सुविधा क्षेत्रीय अधिकारी गोपाळ खटके यांनी केली.
मतदान केंद्रावर मोबाईल मतदारांना नेता येत नसल्याने पोलीस हवालदार शिल्पा खोरे या शाळेच्या प्रवेश द्वारावर मतदारांचे मोबाईल जमा करून परत जाताना त्यांचे मोबाईल
देत होत्या.
अनेकांचे मतदार यादीत फोटो नसल्याने त्यांची नावे मतदार यादीत तून गायब असल्याने केंद्रस्तरिय अधिकाऱ्याकडे आपले नाव मतदार यादीत आहेत का याची खात्री करत होते.तर ज्यांची नावे यादीत आहेत त्यांचे मतदान कुठे आहे याची माहिती मतदारांना केंद्र स्तरिय अधिकारी देत होते.