Lockdown News: निश्चित दरांनुसारच उपचारांचे बंधन; लूट करणाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 04:40 AM2020-05-08T04:40:03+5:302020-05-08T04:40:21+5:30

तक्रार निवारणासाठी लवकरच कॉल सेंटर

Lockdown News: Treatment restricted to fixed rates; Action on looters | Lockdown News: निश्चित दरांनुसारच उपचारांचे बंधन; लूट करणाऱ्यांवर कारवाई

Lockdown News: निश्चित दरांनुसारच उपचारांचे बंधन; लूट करणाऱ्यांवर कारवाई

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयांनी विशिष्ट दराने इतर सर्व उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून दरपत्रकाची अंमलबजावणी करणे व कारवाईसाठी राज्य पातळीवर राज्य आरोग्य सोसायटी सक्षम प्राधिकरण असेल.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व इतर विमा नसलेल्या रुग्णांकडून काही ठिकाणी महागड्या दरात उपचार दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयांनी सर्वात कमी दरात वैद्यकीय सेवा द्यायला हवी, यासाठी उपचार पद्धतीचे दरपत्रक ठरविल्याची माहिती राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. तक्रारींसाठी लवकरच कॉल सेंटर सुरू होणार आहे. मुंबई शहर (collector.mumbaicity@maharashtra.gov.in), मुंबई उपनगर (collector.mumbaisuburban@maharashtra.gov.in) तसेच राज्यातील आपल्या जिल्हा स्तरावर (collector.@maharashtra.gov.in)आणि राज्य स्तर (complaints.healthcharges@jeevandayee.gov.in.) येथे तक्रार करता येईल.

आपत्कालीन स्थितीत सर्वसामान्यांची रुग्णालयांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी मी राज्य सरकारला दरपत्रकाचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार अधिसूचना निघाली आहे. रुग्णांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. - डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य सोसायटी

Web Title: Lockdown News: Treatment restricted to fixed rates; Action on looters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर