Lockdown hits industries, including 35,000 small and large traders in Thane | लॉकडाऊनचा ठाण्यातील छोट्या मोठ्या ३५ हजार व्यापाऱ्यांसह उद्योगांना २ हजार कोटींचा फटका

लॉकडाऊनचा ठाण्यातील छोट्या मोठ्या ३५ हजार व्यापाऱ्यांसह उद्योगांना २ हजार कोटींचा फटका

ठाणे : लॉकडाऊनचा सर्वच स्तराला फटका बसला आहे. ठाण्यातील तब्बल ३५ हजार छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह उद्योगधंदे वाल्यांना या लॉकडाऊनचा तब्बल २ हजार कोटींचा फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे सणासुदीच्या काळातच लॉकडाऊन आल्याने व्यापाºयांचे उत्पन्न बुडाले आहे. परंतु आता येणाºया दिवाळ सणात यातील काहीसा तोटा भरुन निघण्याची आशा या व्यापाºयांना वाटत आहे.
दोन दिवसापूर्वी झालेल्या व्यापाºयांच्या बैठकीत ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे यातून कसे सावरायचे याचाही विचार या बैठकीत झाल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात जांभळी नाका ते स्टेशन परिसर, नौपाडा, राम मारुती रोड आदींसह शहराच्या इतर भागातही व्यापाºयांची दुकाने आहेत. परंतु मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि त्यामुळे व्यापाºयांना आपली दुकाने बंद करावी लागली. याच कालावधीत गुढीपाडवा होता, परंतु लॉकडाऊन झाल्याने खरेदीची ही संधी ग्राहकांना मिळालीच नाही. त्यानंतर आलेल्या इतर सणांना देखील याच लॉकडाऊनचा फटका बसला. त्यातही दुकाने बंद असतांना महावितरणकडून व्यापाºयांना लाखोंची बिले आल्यानेही व्यापारी हैराण झाला होता. या संदर्भात त्यांनी महावितरणकडे पत्रव्यवहारही केला. परंतु त्याचा अद्यापही काहीच उपयोग झालेला नाही.
अशातच आता अनलॉकच्या पहिल्या टप्यापासून ते चवथ्या टप्यापर्यंतही दुकानांमध्ये ग्राहक तुरळकच दिसत आहेत. त्यामुळे दुकानातील माल संपविण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही दुकानदारांनी वेगवेगळ्या स्कीम देऊन, कपड्यांवर व इतर साहित्यावर सुट देऊन ग्राहकांना आकर्षितही करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचाही फारसा फायदा झालेला नाही. त्यात आॅनलाईनच्या खरेदीला ग्राहक पसंती देत असल्याने त्याचाही फटका या व्यापाºयांना फटका बसल्याचेही या बैठकीत एकूणच आता कोरोनाच्या या पाच महिन्यांच्या कालावधीत ठाण्यातील सुमारे ३५ हजार छोट्या मोठ्या व्यापाºयांना सुमारे २ हजार कोटींचा फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता व्यापारी दिड महिन्यांवर आलेल्या दिवाळ सणाकडे आस लावून बसले आहेत. या सणात तरी झालेले नुकसान काही अंशी भरुन निघेल अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत.

वर्षभर व्यापार करुन व्यापाºयांचा फायदा होईल असे नाही. परंतु सणांच्या काळात व्यापाºयांना खुप आशा असते. परंतु यंदा मात्र लॉकडाऊनमध्येच सण गेल्याने या काळातील उत्पन्नालाही मुकावे लागले आहे. आता थंड झालेला हा व्यापार दिवाळीत काही तरी आधार देईल अशी अपेक्षा आहे.
(भावेश मारु - मानस सचिव, ठाणे व्यापार उद्योग महासंघ)

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown hits industries, including 35,000 small and large traders in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.