Join us  

Lockdown : आम्ही काही पाप केलंय का? कुठलंही पॅकेज न मिळाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 8:54 PM

Lockdown : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधताना कडक संचारबंदीची घोषणा केली. त्यामुळे रात्री आठपासून 15 दिवस राज्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधताना कडक संचारबंदीची घोषणा केली. त्यामुळे रात्री आठपासून 15 दिवस राज्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे

मुंबई :  राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने 144 कलम लागू केले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने अधिकृत फेरीवाले, रिक्षा चालक यांच्या खात्यात निधी जमा करण्याचे जाहीर केले. अनेक परप्रांतीयांसाठी पॅकेज जाहीर करताना ठाकरे सरकारने मराठमोळ्या डबेवाल्यांसाठी कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे डबेवाले ठाकरे सरकारवर नाराज झाले असून आम्ही काही पाप केलंय का? असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधताना कडक संचारबंदीची घोषणा केली. त्यामुळे रात्री आठपासून 15 दिवस राज्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या काळात रोजी जाईल पण रोटी मिळेल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर करताना परमीटधारक रिक्षा मालकांना पंधराशे रुपये देण्याचेही सांगितले. तसेच परवानाधारक फेरीवाल्यांसाठीही पॅकेजची घोषणा केली. मात्र, हे करताना मुख्यमंत्री ठाकरे यांना जगप्रसिद्ध मुंबई डबेवाल्यांचा विसर पडला आहे. ठाकरे सरकारकडून डबेवाल्यांसाठी कोणतेही पॅकेज जाहीर न झाल्यामुळे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या काळात डबेवाल्यांची डबे पोहोचवण्याची सेवा देखील बंद राहण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे अनेक डब्बे बंद आहेत. हाताला काम नाही. मग खायचे काय, असा सवाल डब्बेवाल्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकार लॉकडाऊन लावताना आमच्यासाठी काहीतरी तरतूद करेल अशी आशा होती. परंतु, निराशाच पदरी पडली आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा, अशी मागणी उल्हास मुके यांनी केली आहे.  

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यामुख्यमंत्रीउद्धव ठाकरे