Local train derails in Mumbai | कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलचे चाक रुळावरून घसरले, मध्य रेल्वे विस्कळीत
कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलचे चाक रुळावरून घसरले, मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई- मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलचे चाक घसरल्यानं लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली असून, सीएसएमटीकडे जाणारी धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं प्रवाशांची एवढी गर्दी नव्हती. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल विद्याविहार-कुर्ला स्थानकादरम्यान रुळावरून घसरली.

लोकल रुळावरून घसरण्याआधीच लेडिज डब्यात शॉर्ट सर्किट झाल्याचंही एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे. त्यानंतर त्याची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. रेल्वे प्रशासनानं तात्काळ दखल घेत लोकलची दुरुस्ती केली आणि ती पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना झाली. त्याच दरम्यान त्या लोकलचा डबा रुळावरून घसरला. त्यामुळे धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. याचा फटका मेल एक्स्प्रेस गाड्यांना बसला असून, अनेक एक्स्प्रेस उशिरानं धावत आहेत. 


Web Title: Local train derails in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.