रविवारी होळी आणि लोकलचा मेगा ब्लॉक; मुंबईकरांचे हाल होणार

By सचिन लुंगसे | Updated: March 22, 2024 17:36 IST2024-03-22T17:34:10+5:302024-03-22T17:36:24+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकां दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Local Mega Block on Sunday Holi | रविवारी होळी आणि लोकलचा मेगा ब्लॉक; मुंबईकरांचे हाल होणार

रविवारी होळी आणि लोकलचा मेगा ब्लॉक; मुंबईकरांचे हाल होणार

 

मुंबई : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत आहे तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकां दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान लोकल थांबतील. नंतर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिराने धावतील.

ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिरा धावतील.

डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल टिटवाळा लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी ९.५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी ३.३२ वाजता सुटेल.

अप धीम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल आहे. ठाणे येथून ती सकाळी १०.२७  वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल आहे. ठाणे येथून ती दुपारी ४.०३  वाजता सुटेल.

हार्बर मार्ग

सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

डाउन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी १०.१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी ३.४४ वाजता सुटेल.  

अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल / वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-वाशी / नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Web Title: Local Mega Block on Sunday Holi