स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 05:25 IST2025-09-17T05:23:39+5:302025-09-17T05:25:20+5:30

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या गट रचनांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या रचनेला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.

Local body elections in three phases? | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग तीन टप्प्यांमध्ये घेईल अशी शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व महापालिकांची निवडणूक होईल असे चित्र आहे.

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या गट रचनांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या रचनेला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट आरक्षण आणि मतदार याद्या प्रसिद्ध करणे अशी प्रक्रिया होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.

अंदाजानुसार, ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होईल. त्यानंतर नगरपालिकांची निवडणूक होईल आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणूक होईल अशी शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राचे ग्रामीण राजकारण ढवळून निघेल दुसऱ्या टप्प्यात अर्धनागरी क्षेत्रात राजकीय धूम असेल तर तिसऱ्या टप्प्यात शहरी भागांमधील राजकीय वातावरण तापलेले राहील, असे मानले जाते.

अंतिम प्रभाग रचना कधी?

नगरपालिका आणि महापालिका यांची अंतिम प्रभाग रचना नगर विकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला चालू महिन्याअखेर सादर केली जाईल असे म्हटले जाते.

एकूण महापालिका - (जालना व इचलकरंजी नवनिर्मित) : २९

प्रशासक असलेल्या महापालिका : २९

एकूण

नगरपरिषदा : २४८

प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या व नवनिर्मित नगरपरिषदा : २४८

एकूण जिल्हा

परिषदा : ३४

प्रशासक : ३२

एकूण नगरपंचायती : १४७

प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या व नवनिर्मित नगरपंचायती - ४२

प्रशासक असलेल्या एकूण नगरपरिषदा व नगरपंचायती (२४८+४२) : २९०

एकूण पंचायत

समित्या : ३५१

प्रशासक : ३३६

(*भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितींची मुदत मे २०२७ मध्ये संपणार आहे.)

Web Title: Local body elections in three phases?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.