आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 07:42 IST2025-10-31T06:16:22+5:302025-10-31T07:42:23+5:30
बच्चू कडू यांनी नागपुरात शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते

आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आमच्या जाहीरनाम्यात आम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती, असे सांगतानाच ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बच्चू कडू यांनी नागपुरात शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते. याबाबत आंदोलक नेत्यांची मुंबईत रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली.
रेल्वे रोको करणार नाही, कडू यांची हायकोर्टात ग्वाही
नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार नाही, अशी ग्वाही गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
शेतकरी आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर नागपूर खंडपीठाने त्याची दखल घेतली होती.