Join us

LMOTY 2023 : शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर..? राज ठाकरेंनी दिलं मिश्किल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 20:31 IST

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या,  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडला. यावेळी निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि बँकर, तसंच समाजसेविका अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांना त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर चालेला का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला. यावर त्यांनी मश्किलपणे उत्तर दिल्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकला.

“शर्मिला ठाकरे जर सक्रिय राजकारणात आल्या तर मला चालेल. मी घरचं काम करायला तयार आहे,” असं मिश्किल उत्तर राज ठाकरे यांनी यावेळी दिलं. यानंतर सर्वत्र एकच हशा पिकला. त्या माझ्या पुढे गेल्या तरी चालेल. इकडे काही अभिमान चित्रपटाची कथा नाहीये. पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडले,” असं ते यावेळी म्हणाले.

शिवसेनेची धुरा तुमच्याकडे असती तर..?मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेची धुरा तुमच्या हाती असती तर आजची परिस्थिती वेगळी असती का असा सवाल केला. यावर त्यांनी दिवार चित्रपटातील एक संवाद बोलत मिश्किलपणे उत्तर दिलं. “मी तो विषय बंद करून टाकला आहे. मी धुरा सांभाळली असती तर काय झालं असतं अशा गोष्टींना आता काही अर्थ नाही. ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर आहेत. जे सांभाळतायत ते सांभाळतील. मी माझा पक्ष काढलाय तो चालवतोय,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मी एक पक्ष स्थापन केलाय. माझं मी काय करतोय ते मला माहितीये. मला अजून कोणाच्या धुरा व्हायचं नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023राज ठाकरेमनसे