लाइट बिल आता कमी होणार, वीज दरात २० पैशांची कपात; ग्राहकांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 07:33 IST2026-03-28T07:33:33+5:302026-03-28T07:33:33+5:30

यंदाच्या वीज दर निश्चितीमध्ये वाढ नाही; हाच काय तो दिलासा ग्राहकांना आहे.

light bill will now be reduced electricity price cut by 20 paise big relief for consumers | लाइट बिल आता कमी होणार, वीज दरात २० पैशांची कपात; ग्राहकांना मोठा दिलासा

लाइट बिल आता कमी होणार, वीज दरात २० पैशांची कपात; ग्राहकांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महावितरणने दाखल केलेल्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षांकरिता वीज दरात कपात केली. त्यानुसार, १ एप्रिलपासून १ ते १०० युनिटपर्यंतचा वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता ७ रुपये ३१ पैसेऐवजी ७ रुपये १० पैसे प्रति युनिट दराने वीज बिल येईल. पुढील वर्गवारीला काही प्रमाणात  कपात कपात असून, यंदाच्या वीज दर निश्चितीमध्ये वाढ नाही; हाच काय तो दिलासा ग्राहकांना आहे.

महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीज दर याचिकेवर आयोगाने आदेश दिला आहे. त्यानुसार, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांसाठीचे दर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत.  गेल्या वर्षी मार्च अखेरीस आयोगाने एक आदेश दिला होता. त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. महावितरणच्या पुनर्विचार याचिकेनुसार आयोगाने जून २०२५ मध्ये आदेश दिला होता. 

उद्योगांना व व्यावसायिक ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत सुरूच राहणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत या ग्राहकांना मिळणार आहे. उत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या पहिल्या पाळीत सवलतीच्या दराने वीज मिळेल.

स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळात वीजवापराकरिता प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत होती. आता ८५ पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर १० रुपये ७८ पैसे यावरून कमी होऊन १० रुपये ७१ पैसे इतका होईल. घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांच्या सवलती कायम राहणार आहेत.

वीज     दर     प्रति युनिट/रुपयांत
युनिट     जुने दर     नवे दर 
        (१ एप्रिलपासून लागू)
१-१००     ७.३१     ७.१०
१०१-३००     १३.१७     १२.९४
३०१-५००     १७.५६     १७.३५
५०० वर     १९.१५     १९.१४

महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पाच वर्षांत २६ टक्के कपात आहे. एकूण घरगुती वीज ग्राहकांमध्ये या गटातील ग्राहकांचे प्रमाण ७० टक्के आहे. १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच्या वीजदरातही पाच वर्षांत पाच टक्के कपात आहे. उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट ९ रुपये ५० पैसे इतका दर असेल. २०३० पर्यंत हा दर जवळजवळ स्थिर राहणार असल्याने विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल. - विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण.

Web Title : बिजली बिलों में 20 पैसे की कटौती, दरों में कमी से राहत।

Web Summary : एमएसईडीसीएल ने बिजली दरों में 20 पैसे प्रति यूनिट की कटौती की, जो 1 अप्रैल से प्रभावी है, जिससे उपभोक्ताओं को राहत मिली है। 100 यूनिट तक कम दरें। उद्योगों के लिए टीओडी रियायतें जारी हैं। सौर रूफटॉप और ईवी चार्जिंग के लिए प्रोत्साहन भी बरकरार हैं।

Web Title : Electricity bills to decrease with 20 paisa cut in rates.

Web Summary : MSEDCL electricity rates reduced by 20 paisa per unit for five years, effective April 1, offering relief to consumers. Lower rates for up to 100 units. TOD concessions continue for industries. Incentives for solar rooftops and EV charging also remain.

टॅग्स :electricityवीज