Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: मुंबईत भीषण दुर्घटना! भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 08:00 IST

Mumbai Byculla Lift Collapse News: मध्य मुंबईतील भायखळा परिसरात बुधवारी रात्री एका १८ मजली निवासी इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली. या भीषण घटनेत किमान ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मध्य मुंबईतीलभायखळा परिसरात असलेल्या 'जयकृपा टॉवर'मध्ये काल रात्री उशिरा एक भीषण घटना घडली.१८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळल्याने ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथील 'जयकृपा टॉवर' या १८ मजली इमारतीमध्ये बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावर असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि ती थेट तळमजल्यावर कोसळली. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाने या घटनेला दुजोरा दिला.

केबल तुटल्याचा प्राथमिक अंदाज

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने किंवा केबल तुटल्याने हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून वेगाने खाली कोसळल्याने लिफ्टमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने कामाला लागले. मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बेस्टचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका देखील तातडीने पाचारण करण्यात आल्या. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तिघांना जेजे रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात, तर अन्य एकाला जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  या घटनेमुळे लिफ्टच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आणि संबंधित विभाग या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Lift Collapses in Byculla Building, Five Severely Injured

Web Summary : A lift collapsed in an 18-story building in Byculla, Mumbai, injuring five. The incident occurred due to a suspected cable malfunction, causing the lift to plummet from the fourth floor. Injured individuals are receiving hospital treatment, prompting an investigation into lift safety.
टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रभायखळा