नवजात मुलीची हत्या करणाऱ्या विधवेची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 01:15 AM2020-08-13T01:15:58+5:302020-08-13T01:16:08+5:30

न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. पी. तावडे यांनी कमलाबाई घरत हिला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

The life sentence of the widow who killed the newborn girl remains | नवजात मुलीची हत्या करणाऱ्या विधवेची जन्मठेप कायम

नवजात मुलीची हत्या करणाऱ्या विधवेची जन्मठेप कायम

Next

मुंबई : अनैतिक संबंध लपवण्यासाठी स्वत:च्या नवजात मुलीची हत्या करणाºया विधवा स्त्रीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली. २७ वर्षांपूर्वी तिने हा गुन्हा केला होता. पतीच्या निधनानंतर आठ वर्षांनी अनैतिक संबंधातून तिला मुलगी झाली होती.

न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. पी. तावडे यांनी कमलाबाई घरत हिला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. सरकारी वकिलांनी आरोपांची साखळी सिद्ध केली आहे. नवजात बाळाची हत्या अन्य कोणी केली नसून आरोपीने केली आहे, असे न्यायालयाने म्हटले.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, १० नोव्हेंबर १९९३ रोजी न्हावा-शेवा येथील एका रहिवासी महिलेला शेवा बसस्टॉपजवळ एक नवजात मुलगी सापडली. त्या महिलेने त्या मुलीची काळजी घेतली आणि यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी घरत हिला अटक केली. कारण ती गरोदर होती आणि तिनेच मुलीला सोडल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी घरत आणि तिच्या मुलीला उरणच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर अलिबाग सिव्हिल रुग्णालयात मायलेकींना नेण्यात आले. तिथे तिने मुलीचा गळा आवळून हत्या केली. १९९५ रोजी सत्र न्यायालयाने घरत हिला मुलीची हत्या केल्याप्रकरणी तिला जन्मठेप ठोठावली. त्यानंतर तिने उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. मंगळवारी उच्च न्यायालयाने तिचा अपील फेटाळला.

Web Title: The life sentence of the widow who killed the newborn girl remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.