Join us

कामगारांच्या जीवाशी खेळ, रोज ७,५०० कामगार गमावतात प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:21 IST

कारखान्यांमध्ये फक्त ३० टक्के सुरक्षा; सीआयआयची वार्षिक परिषद

मुंबई : कामाच्या ठिकाणी असलेल्या असुरक्षिततेमुळे जगभरात दररोज ७,५०० कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागतात. जगाच्या अर्थव्यवस्थेत कारखान्यांच्या सुरक्षेसंबंधी ४ टक्के तूट आहे, असे मत अमेरिकेतील ‘३एम’ या आरोग्य क्षेत्रातील कंपनीच्या संचालक एलेन व्हाइट यांनी व्यक्त केले.

भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) नवरोजी गोदरेज सेंटर आॅफ एक्सलन्स ही वार्षिक परिषद विक्रोळी येथे झाली. त्यामध्ये व्हाइट यांनी कारखान्यांमधील सुरक्षेवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जगभरात कारखान्यांमध्ये कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी आणखी किमान १.२५ लाख कोटी डॉलर्स खर्च करण्याची गरज आहे. तरच कामगारांना १०० टक्के सुरक्षा मिळू शकेल. आशियातील देशांमधील ही तूट जीडीपीच्या जवळपास २० टक्के आहे. भारत सरकारने मेक इन इंडियाद्वारे उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये कारखान्यांमधील सुरक्षा अग्रस्थानी असावी. देशांतर्गत कारखान्यांमधील सुरक्षेचे प्रमाण सध्या फक्त ३० टक्के असल्याची खंत राष्टÑीय सुरक्षा परिषदेचे (एनएससी) महासंचालक व्ही. बी. संत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कारखाने व कंपन्यांना कर्ज देताना बँकांनी तेथील सुरक्षेची तपासणी करावी. कर्ज देतानाच्या मुख्य निकषांमध्ये कर्मचाºयांची सुरक्षा अग्रस्थानी असावी. सरकारकडून धोरणात तसा बदल व्हावा. सुरक्षा निरीक्षकांनी केवळ कारखान्यांमधील सुरक्षेची पाहणी न करता, सक्षम सुरक्षा उभी राहण्यासाठी कारखान्यांना सुविधा द्यावी.सीआयआयच्या औद्योगिक सुरक्षा कृती दलाचे अध्यक्ष अनिल वर्मा यांनीही कारखाने १०० टक्के अपघातमुक्त झाल्याखेरीज मेक इन इंडिया यशस्वी होणार नाही, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :मुंबईमृत्यू